जवळबन येथील गंगाबाई श्रीरंग करपे ( वय ३५ ) या महिलेने घरी कोणी नसताना रविवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल भोसले यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. प्रवीण चंद्रकांत करपे यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक राहुल भोसले हे पुढील तपास करत आहेत.