क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांची आणखी एक मोठी कारवाई, साडेचार लाखांच्या मुद्देमाल जप्त तर तिघांवर गुन्हा दाखल……!
केज दि.१८ – बीड शहरात एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारून मोठ्या प्रमाणावर गांजा पकडला असून तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 17/01/2022रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की दीलावर नगर पेठ बीड येथे अकबर खान गुल मंमदखान पठाण हा बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ गांजाची चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगत आहे. सदर माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना कळविल्याने पंकज कुमावत यांनी पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः व पोलीस ठाणे केज येथील पीएसआय दादासाहेब सिद्धे, सीमाली कोळी व उपविभागीय कार्यालय तसेच पोस्टे केज च्या स्टाफने सदर ठिकाणी जाऊन 20.40 वाजता छापा मारला.
सदर ठिकाणी एक महिला व एक इसम जागीच मिळून आले असता घराची झडती घेतल्यानंतर सदर इसमाचे तळघरांमध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये व रेगजिन बॅगमध्ये एकूण 40 किलो 800 मिली अमली पदार्थ गांजा ज्याची किंमत चार लाख 27 हजार रुपये आहे. तर तीन आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे पेठ बीड येथे पीएसआय सिद्धे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत व पीएसआय दादासाहेब सिद्धे, सीमाली कोळी, एएसआय शेषराव यादव, पोहेका बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे, सचिन अहंकारे, महादेव सातपुते, विकास चोपणे, दीलीप गिते, संजय टूले, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे व पेठ बीड येथील सपोनी श्री. पालवे,पोउपनी गंगाधर दराडे व पोलीस अमलदार यांनी केली.