आरोग्य व शिक्षण
पहिली दुसरीच्या वर्गांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची घोषणा…..!

बीड दि.२३ – राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. तेंव्हा त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या (CBSE) धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून वाद निर्माण केला जातो, त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्यामुळे पहिली दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा,छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असल्याचंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.