#Accident

भीषण अपघात सात भावी डॉक्टर्सचा मृत्यू…….!

5 / 100

वर्धा दि.२५ – मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा वर्ध्यातील कारचा दि.25 रोजी रात्री 1 च्या दरम्यान (7 Medical Students killed in Wardha car accident) अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मेडिकल कॉलेजमधील सात मित्रांच्या महिंद्रा एक्सयूव्ही (Mahindra XUV 500) कारचा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात कार तब्बल चाळीस फूट खोल नदीत पडली. कारमधील सातही जण अपघातात जागीच ठार झाले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती. यात कारचा चक्काचूर झाला होता.

अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी हे हॉस्टेलमध्ये राहत होते. रात्री दहा वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना देण्यात आली होती. दरम्यान, वाढदिवस साजरा करण्याच्या हेतून आपण बाहेर आलो असल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना कळवलं होतं. फोनवरुन सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना याबाबत सांगण्यात आलं होतं. रात्री दहा वाजता हॉस्टेल विद्यार्थी न आल्यामुळे हॉस्टेलमधील वरिष्ठांनाही काळजी लागून राहिली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्यानं सर्वच चिंतित होते. अखेर पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाती मृत्यू बातमी येऊन धडकल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एक जण महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातील तिरोड्याचे आमदार रहांगडाले यांचे सुपुत्र आविष्कार रहांगडाले याचाही या अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना शोककळा पसरली आहे. अपघातातील फक्त एक विद्यार्थी महाराष्ट्रातला तर तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. तर एक विद्यार्थी हा ओदिशाचा होता.

दरम्यान, सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे. नीरजचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. नदीवरील पुलाचा कठडा तोडून कार थेट चाळीस फूट खाली कोसळली आणि यात सातही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे दोन विद्यार्ती यावेळी गाडीत होते. या विद्यार्थ्यांमध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले आणि आणखीन एक विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याचं नाव पवन शक्ती असं असल्याचं ओएसडींनी म्हटलंय.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close