क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची चंदन चोरी प्रकरणी मोठी कारवाई, 85 हजारांचा मुद्देमाल जप्त तर तिघांवर गुन्हा दाखल……!
बीड दि.27 – एएसपी पंकज कुमावत यांनी मागच्या कांही दिवसांपासून चंदन चोरांकडे मोर्चा वळवला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन जप्त करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.आणि अशीच आणखी एक धाडसी करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 26/01/2022 रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की, अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांचे शेतात बाळासाहेब दत्तात्रय जाधव रा. केज हा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायदा करीता काही इसमाना एकत्र जमून परिसरातील चंदनाची झाडे चोरून तोडून देवराव कुंडगर यांचे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तासून चंदनाचा गाबा काढून पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून सेड मध्ये ठेवलेले ठेवला आहे .अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना कळविल्याने पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे पोलीस आमदार यांनी सदर ठिकाणी जाऊन दिनाक 26/01/2022 रोजी 22.30 वाजता छापा मारला. सदर ठिकाणी एक इसम जागीच मिळून आला आणि त्यांच्या ताब्यातील पत्र्याचे शेड ची व परिसराची पंचा समक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणचे पत्र्याचे शेड मध्ये पांढरे दोन पोत्यामध्ये 27 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडा मधून काढलेला चंदनाचा गाभा त्याची किंमत 67500 हजार रुपये असून एक मोबाईल 10000 र. असा एकूण 85500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, देवराव कुंडगीर यांना सदर चा माल कोणाचा आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर चा माल बाळासाहेब दत्तात्रय जाधव (रा. केज) यांचा असून त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा मुनीम सतीश व मी दोघे जन माल घेतो असे सांगितले. त्यावरून वरील तीन आरोपी विरुद्ध सपोनि संतोष मिसळे यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे, पोहेका बालाजी दराडे बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे, राम हरी भंडारे, सचिन आहंकारे यांनी केली.