क्राइम
ग्रामसभेत दारूबंदी विषयी बोलणाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलीसांत तक्रार……!

केज दि.२९ – 26 जानेवारी रोजी ग्रामसभेत दारू बंदी विषयी बोलल्याने त्याचा राग मनात धरून एकास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथे 26 जानेवारी 2022 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रविंद्र विक्रम ढगे हे दारूबंदी विषयी बोलले होते. त्याचा राग मनात धरून हनुमंत धोंडीराम ढगे याने दि.29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विक्रम ढगे यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विक्रम ढगे यांनी युसुफ वडगाव पोलीसांत दिली असून सदरील प्रकरणी प्रतिबंधक कारवाईचे आदेश एपीआय संदीप दहिफळे यांनी पोह श्री. खेडकर यांना दिले आहेत.
