केज तालुक्यातील धनेगाव कॅम्प येथे संभाजी ब्रिगेड व संघर्ष युवा ग्रुप मित्र परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या लढ्यात संपुर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबून कोरोनाशी लढा देणारे बरेचशे डॉक्टर, सफाई कामगार, पोलिस, प्रशासकीय अधिकारी बळी पडत असून याच कोरोनाशी लढणाऱ्या योध्यासाठी दि. 12 जून 2020 रोजी शासकीय विश्राम गृह धनेगाव कॅम्प येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील सुजाण नागरिकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून कोरोनाशी लढनाऱ्या प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी केले आहे.