केज तालुक्यातील डोणगाव येथील श्रीराम प्रभू घुले यांचे उमरी फाट्यावरील साखर कारखान्यासमोर बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील मजुरास उमरी गावात सोडून येतो अशी थाप मारून नारायण बळीराम लहाने ( रा. अयोध्या नगर, बहिरवाडी रोड, बीड ) याने श्रीराम घुले यांची १५ हजार रुपये किंमतीची जुनी दुचाकी ( एम. एच. ४४ व्ही. ४०३९ ) १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नेली. त्याने परत आणून न देता दुचाकी चोरून नेल्याची फिर्याद श्रीराम घुले यांनी दिल्यावरून नारायण लहाने याच्याविरुद्ध केज पोलिसात २९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे पुढील तपास करत आहेत.