केवळ कोरोनावरच नव्हे तर इतरही 20 आजारांवर प्रभावी आहे लस……!
नविदिल्ली दि.३१ – जगभरात कोरोनाने थैमान घातलं, लाखो लोकांचे जीव घेतले. अनेक ठिकाणी तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याशिवाय जगाचं आर्थिक चक्रही बिघडलं. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे हाच करोना आता नियंत्रणात येत आहे.कोरोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना लसीकरणाचं आवाहन करत लसीमुळे संरक्षण मिळालेल्या एकूण २१ आजारांची माहिती दिली आहे. व्हॅक्सिन्स वर्क (Vaccines Work) या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन WHO ने केलंय.
करोना लसीमुळे कोणत्या २१ आजारांपासून संरक्षण होतं?
१. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer) २. पटकी/कॉलरा (Cholera)३. घटसर्प (Diphtheria) ४. इबोला (Ebola)५. हेप बी (Hep B) ६. इन्फ्लुएंझा (Influenza) ७. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis) ८. गोवर (Measles) ९. मेंदुज्वर (Meningitis) १०. गालगुंड ११. कोरोना (Mumps) १२. डांग्या खोकला (Pertussis) १३. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia) १४. पोलिओ (Polio) १५. रेबिज (Rabies)१६ रोटा व्हायरस (Rotavirus) १७. गोवर (Rubella) १८. धनुर्वात (Tetanus) १९. विषमज्वर (Typhoid) २०. कांजण्या (Varicella) २१. पीतज्वर (Yellow Fever)
दरम्यान, मुलं करोना काळात देखील वाढत असतात. त्यामुळे या काळात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला हवी. करोना लस सर्व वयोगटातील व्यक्तींना संरक्षण देते. मुलांना आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी लस देणे हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक पर्याय आहे. त्यामुळे लस घेण्यास उशीर करू नका, आजच आपली लस घ्या, असं आवाहन WHO ने आपल्या ट्वीटमध्ये केलंय.