परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार? विद्यार्थ्यांचे आंदोलन……!
मुंबई दि.31 – शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? या मुद्द्यावरुन दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आज मुंबईत विविध भागात आंदोलनास सुरूवात केली. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.
परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं आणि वेळापत्रकानुसारच घेण्यात येतील असल्याचं कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. यानंतर मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले आणि त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. आता हे आंदोलन चिघळत चालल्याचं दिसत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नसून परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. सध्या या आंदोलनाचे पडसाद हळूहळू राज्यभर उमटू लागले आहेत. ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे. असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का? याचा देखील शोध घेतला जात असल्याचं बोललं जात आहे.