जिल्ह्यातील केज, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी तालुक्यातील नगरपंचयात च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. सदरील नगरपंचयात च्या पदाधिकारी निवडीसाठी येत्या 3 तारखेला नामनिर्देशन पत्र भरायचे होते. परंतु त्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता नगराध्यक्ष पदासाठी दि.7 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करायचे असून उपनगराध्यक्ष पदासाठी दि.11 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करायचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता लागली आहे.