क्राइम
फरार आरोपीला केज पोलिसांनी ठोकल्या बेड्या……!
केज दि.०१ – न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या पासून अकरा वर्ष फरार असलेल्या आरोपीला केज पोलीसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
अकरा वर्षा पूर्वी केज तालुक्यातील लव्हुरी येथील छत्रभुज विठ्ठल चाळक हा बनावट अपंग प्रमाणपत्र व बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी त्याला केज न्यायालयाने दोषी ठरवून त्याला पंचवीस हजार रु. दंड व एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच या निर्णयाला त्याने आवाहन देत सत्र न्यायालयात अपील केले असता सत्र न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम ठेवली होती. दरम्यान त्या निर्णया नंतर अकरा वर्ष छत्रभुज चाळक हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. दरम्यान, अकरा वर्षां पासून त्याच्यावर स्टँडिंग वॉरंट होते. दरम्यान शिक्षा झालेला फरार आरोपी हा त्याच्या घरी आल्याची माहिती सहाय्यक फौजदार अनिस शेख यांना मिळताच त्यांनी दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:१५ वा. च्या दरम्यान त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना माहिती दिली आणि सहाय्यक फौजदार कादरी, पोलीस नाईक शेख चाँद यांना सोबत घेऊन छत्रभुज चाळक याला ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याला न्यायालया समोर हजर करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.