क्राइम
संधी साधून डल्ला मारला, केज पोलीसांत गुन्हा दाखल…..!

केज दि.०३ – घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातील कपाटात ठेवलेले नगदी ८ हजार रुपये व दागिने असा ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील तांबवा येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तांबवा येथील शेषेराव गोवर्धन कराड यांचे गावात किराणा दुकान असून त्यांचे कुटुंब बाहेर गावी गेले होते. दुकान बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानाची झडती घेऊन दुकानात असलेले लोखंडी कपाट फोडून कपाटाच्या ड्रायव्हरमध्ये ठेवलेले मणी गंठण, दोन अंगठ्या, नगदी ८ हजार रुपये असा ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान घडली. शेषेराव कराड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे हे करीत आहेत.
