आपला जिल्हा
जिल्हा परिषद बीड व VOPA माध्यमातून १० वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना Vschool ची सुविधा
विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा - राहुल रेखावर
केज – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग बीड व पुणे येथील VOPA या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून १० वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून Vschool हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्या वेबसाईट चे उदघाटन आज बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावर व सीईओ अजित कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकली शाळा कधी सुरू होतील हे निश्चित नाही. त्यामुळे १० वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग बीड व पुणे येथील Vowels of the People Association पुणे यांच्या माध्यमातून Vschool हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना स्वयं मूल्यांकन व चर्चे द्वारे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. याद्वारे शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थी ज्ञानार्जन करू शकणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी http://ssc .vopa.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन शिक्षण घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सीईओ अजित कुंभार यांनी केले आहे.