आरोग्य व शिक्षण
कोरोनावर होमिओपॅथीने प्रभावि उपचार शक्य – डाॅ. दत्तात्रय ठोंबरे
काळजी घ्या, सुरक्षित रहा
केज दि.१२ – सध्या जगभर कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात चुकीचे व भीती वाढवणारे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे सामान्य जनतेत गोंधळाची व भीतीची भावना पसरत आहे.
वस्तुतः कोविड 19 या विषाणूची तीव्रता कमी होत आहे. त्या विषाणू मध्ये बरेच mutations म्हणजेच संरचणात्मक बदल होत असल्याने त्याची मारक क्षमता कमी होत आहे. शिवाय भारतात कोरोना मुळे होणारा मृत्यू दर बराच कमी आहे. इतर काही आजार असतील उदा. डायबिटीस, ब्लडप्रेशर, किडनी विकार इ. तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या शिवाय होमिओपॅथी औषधं Ars Alb 30 हे औषध दर महिन्याला 3 दिवस सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे. या शिवाय Bry, Rhus tox, Ant tart, Ipicacuna, Belladona, Aconite, Spongia tosta, Gels., Sep. इ होमिओपॅथी औषधं तज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्यानेच घ्यावीत, असे शासन आदेशात सुचित केले आहे. कोरोना हा आजार योग्य औषध उपचाराने बरा होतो. असे प्रतिपादन केज येथील हर्ष होमिओपॅथी क्लिनिक चे संचालक होमिओपॅथी तज्ञ डाॅ. दत्तात्रय ठोंबरे यांनी केले आहे.