महाराष्ट्र
आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले……!

सिंधुदुर्ग दि.०७ – भाजप आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरला हलविण्यात येत आहे. डॉक्टरांच्या पथकासह कार्डियाक रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना कोल्हापूरला घेऊन जात आहेत. नितेश यांच्यावर ओरोस येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून छातीत दुखू लागल्याची त्यांनी तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र, ओरोस रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने आणि कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता त्यांना कोल्हापूरला नेलं जात आहे.