आरोग्य व शिक्षण
उद्यापासून मिळणार बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉलटिकेट……!

पुणे दि.०८ – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Hsc Exam) परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट (Hsc Exam hall ticket) मिळणार आहे. दुपारी 1 च्या पुढे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड (Online Hall ticket) करता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना पुन्हा वाढल्याने यंदा दाहावी आणि बारावीच्या परीक्षाचं काय होणार याबबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांचं लसीकरण करत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक होताना दिसून आले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलनही केलं. मात्र शासनाने आपाला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे स्पष्ट केलं, त्यानंतर आता हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली आहे.
