चॉकलेट डे चा रंजक इतिहास……!

प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा व्हॅलेंटाइन वीक म्हणून साजरा केला जातो. अनेक जण या आठवड्यात आपल्या प्रेमाची कबुली देत असतात. ‘रोज डे’ आणि ‘प्रपोज डे’ नंतर आज 9 फेब्रुवारी ‘चॉकलेट डे’ साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात. चॉकलेटच्या इतिहासासंदर्भात जाणून घेऊयात काही खास गोष्टी.
अमेरिकेत 4 हजार वर्षांपूर्वी कोकोचं झाड आढळलं होतं. अमेरिकेच्या जंगलात या कोकोच्या बियांपासून चॉकलेट बनवलं जातं. जगात पहिल्यांदाच अमेरिका व मेक्सिकोनं चॉकलेटवर पहिले प्रयोग केले. 1528 मध्ये स्पेनच्या राजानं मेक्सिकोवर कब्जा केला. त्या राजाला कोको प्रचंड आवडलं होतं.कॉनराड जोहान्स वान हॉट यांनी 1828 मध्ये ‘कोको प्रेस’ मशीन तयार केलं. कोकोच्या बियांपासून बनवलेल्या चॉकलेटची चव पूर्वी तिखट असायची. जोहान्सनं बनवलेल्या मशीनच्या मदतीनं चॉकलेटचा तिखटपणा दूर केला गेला असं म्हटलं जातं.
दरम्यान, जे. ए. आर. फ्राय अँड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीनं 1848 मध्ये कोकोत दूध, साखर आणि बटर मिसळून आपण आज जे चॉकलेट खातो असं चॉकलेट बनवायला सुरवात केली. चॉकलेट रक्तप्रवाहासाठी, हृदयासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. तसेच चॉकलेटमुळे थकवा दूर होण्यासही मदत होते.