#Social
जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न, पाच आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात……!

बीड दि.१० – केज तालुक्यातील लहुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी येथील अतिक्रमण धारकांनी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे आणि बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी दीपक कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, बंकट जाधव, पंढरी गायसमुद्रे, गणेश जाधव आणि दादाराव गायसमुद्रे या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.