#Social
अखेर आजपासून उपोषण सुरू…..काय आहेत नागरिकांच्या मागण्या……?……!
केज दि.१३ – कित्येकदा अर्ज विनंत्या, तक्रारी करूनही गावच्या पूर्व भागात पाणीच येत नसल्याने आज साळेगाव ता. केज येथील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.
केज तालुक्यातील साळेगाव येथील बस स्टँडच्या परिसरातील भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही ग्रामपंचायने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील नागरिकांनी दि.३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, जर या भागात पाणी पुरवठा झाला नाही; तर दि. १३ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्यात येईल.
दरम्यान, आज दि.१३ फेब्रुवारी रोजी साळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बालासाहेब बचुटे, लक्ष्मण लांडगे, सचिन राऊत, बलभीम बचुटे, जय जोगदंड, रत्नाकर राऊत, रामेश्वर शिंदे, सय्यद अझर, अजय बचुटे, अक्षय वरपे, सलामत पठाण, शिवसेनेचे ज्योतिकांत कलसकर हे उपोषणार्थी उपोषणाला बसले आहेत.