#Accident
चालत्या कारने घेतला पेट, केज जवळील थरार…..!

केज दि.१४ – लातूरहून केजला निघालेल्या कारने केज जवळ कुंबेफळ येथे आल्यानंतर अचानक पेट घेतल्याने सदरील कार जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लातूर येथील गणेश महापुरकर (ऑडीटर) व त्यांचे अन्य चार सहकारी हे सकाळी केजकडे निघाले होते.दरम्यान सदर कार दि.14 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान कुंबेफळ जवळ आली असता कारच्या समोरील भागातून धूर निघत असल्याचे महापुरकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ गाडी बाजूला घेऊन सर्वजण खाली उतरले. मात्र कांही मिनिटात गाडीने पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.
