क्राइम
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, केजमध्ये नगरपंचायत च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…..
बीड दि.15 – काँग्रेस सोबत आघाडी करून जनविकास आघाडीच्या सिताताई बन्सोड या केजच्या नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर या नूतन पदाधिकाऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली, जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना मिरवणूक काढून तो मोडल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यातील नगर पंचायत नगराध्यक्ष अन उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. यामध्ये बीड जिल्ह्यातील केजच्या नगराध्यक्ष पदी जनविकास आघाडीच्या सिताताई बन्सोड यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदी शीतल दांगट यांची निवड झाली.
दरम्यान, नूतन पदाधिकारी यांची त्यानंतर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो लोकांचा जमाव होता. जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मिरवणूक, मोर्चे आंदोलन याला बंदी आहे. मात्र केजमध्ये ही बंदी मोडण्यात आल्याने केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.