अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलीसांत गुन्हा दाखल……!

धारुर दि.१६ – शहरातील एक अल्पवयीन मुलगी फोटो काढण्यासाठी आली असता तिच्यावर अत्याचार केल्याची घटना धारुर शहरात उघडकीस आली. या घटनेने खळबळ माजली असून, याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एक अल्पवयीन मुलगी नरसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी आली होती. आरोपीने फोटो काढून लगेच न देता दुसऱ्या दिवशी फोटो घेऊन जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलगी आली असता तिला दुकान बसवून घेतले. यावेळी एक जण बाहेर काम आहे म्हणून गेला. त्यावेळी दुकानात एक मुलगा व मुलगी असे दोघेच होते. यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीच्या इच्छे विरुद्ध शारिरीक अत्याचार करुन कोणाला सांगितले तर तुझ्या भावाला ठार मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून दोघांविरुद्ध धारुर पोलीस ठाण्यात कलम ३७६, ५०४ भा.द.वी. व पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास एपीआय विजय आटोळे हे करत आहेत.