#Social
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने बीड जिल्ह्यात रक्तदान शिबिर..…..!
बीड दि.१६ – WMO बीड जिल्हा तर्फे १६ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. बीड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७,१८,१९,२०,२२,२५ फेब्रुवारी (शिवजयंती निमित्त) जिल्हाभरात बीड, गेवराई, धारूर, अंबाजोगाई या तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन टीमने केले आहे.
नाव नोंदणीसाठी 9284752355, 8975927711 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये दि. १७ फेब्रुवारी रोजी दिपेवडगाव ता. केज येथे हनुमान मंदिर, दि. १८ रोजी चंदन सावरगाव येथे हनुमान मंदिर,भाटुंबा येथे हनुमान मंदिर,पहाडी पारगाव येथे हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,दि. १९ रोजी बीडमध्ये चंपावती इंग्लिश स्कूल, नगर नाका,गोंधी खुर्द ता. गेवराई येथे विठ्ठल मंदिर ,वडगांव सुशी ता.गेवराई येथे हनुमान मंदिर सभागृह, डोंगरपिंपळा ता.अंबाजोगाई येथे हनुमान मंदिर, वरपगाव ता.अंबाजोगाई येथे ग्रामपंचायत कार्यालय,पोखरी ता. अंबाजोगाई येथे ग्रामपंचायत कार्यालय
दैठण ता. गेवराई येथे बस स्टॉप.
तर दि. २० रोजी लाडेगाव ता.केज येथे हनुमान मंदिर, जवळबन ता. केज येथे आयुर्वेदिक दवाखाना, कानडी बदन ता. केज, दि.२५ रोजी बेलगुडवाडी ता. गेवराई येथे हनुमान मंदिर तर देवपिंपरी ता. गेवराई येथे आयोजित करण्यात आले आहे.