क्राइम

दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दारुड्या विरुद्ध गुन्हा दाखल….!

2 / 100
केज दि.२० – पोलीस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध कठोर पावले उचलून पोलीसांनी त्या दारुड्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
       अधिक माहिती अशी की, दि. २० फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात कोठी ता. केज येथील शेषेराव तुकाराम नवले, वय ४८ वर्ष याने मोठ मोठ्याने आरडा-ओरड करून गोंधळ घातला. त्या वेळी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीसांनी त्याच्या तोंडाचा वास घेतला असता आंबट व उग्र स्वरूपाचा वास आला. म्हणून त्याला उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून सदर शेषेराव तुकाराम नवले याने अमली पदार्थाचे सेवन केला असल्याचा अहवाल दिला. त्या नंतर पोलीस अमंलदार जसवंत शेप यांच्या फिर्यादी वरून शेषेराव तुकाराम नवले याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अमली पदार्थाचे सेवन करून गोंधळ घातल्या प्रकरणी गु.र.नं. ४५/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ४५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार जोगदंड हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close