#Social
मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त मेजर गणेश लामतुरे यांनी पोरक्या झालेल्या मुलींना केली मदत…..!
केज दि.२४ – तालुक्यातील युसूफवडगांव येथील मेजर गणेश लामतुरे यांनी काल दि.२३ फेब्रुवारी रोजी आपल्या लाडक्या मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळुन अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील आईवडिलांच्या छत्रछायेविना पोरक्या झालेल्या दोन मुलींना आवश्यक मदत करून लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा केला.
देशसेवे बरोबरच समाज सेवा करण्याचे व्रत हाती घेतलेल्या आणि सध्या पंजाब येथे भारतीय सिमेवर भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी कर्तव्यावर असलेले युसूफवडगांवचे भुमिपुत्र मेजर गणेश लामतुरे यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळुन तो सतकर्मी लावण्याचे ठरवले.त्यानुसार आईवडीलांच्या छत्रछायेविना पोरक्या झालेल्या आणि वृद्ध आज्जीचा आधार असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील त्या दोघीं बहिणींना मेजर गणेश लामतुरे यांनी लाडक्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त धानोरा बुद्रुक येथे आपल्या मित्रांच्या मदतीने कपडे,शैक्षणिक साहित्य तसेच किमान दोन महिने पुरेल इतकं किराणा सामान त्यांच्याकडे सुपूर्द केले
तसेच भविष्यात सुद्धा लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देऊन आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद थोरात, बापुसाहेब भुसारी, पत्रकार सचिन उजगरे, गोविंद तानगे, अमर क्षिरसागर हे उपस्थित होते.