क्राइम
बीडमध्ये गोळीबार, दोघे जखमी…..!

बीड दि.२५ – येथील रजिस्ट्री कार्यालयात आज (दि.२५) सकाळी ११ च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती असून यात दोघे जखमी झाले आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमींची नावे आहेत.
बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. यात सतीश क्षीरसागर याच्या पायाला गोळी लागली असून फारुक सिद्दीकीच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे.