#Accident
अज्ञात वाहनाची हरणाला धडक…….!

केज दि.२६ – केज अंबाजोगाई रोडवरील भाटुंबा फाट्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या हरणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण गंभीर जखमी झाले आहे.
शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान भाटुंबा फाट्या नजीक एक हरीण रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वाहनाने धडक दिली आहे. यामध्ये हरणाच्या मागच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे.
दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर जवळच असलेल्या अनिल कापरे व इतरांनी सदरील जखमी हरणाला जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर ठेवले असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सदरील घटनेची माहिती वनविभागाचे श्री.पारवे यांना दिली असून ते घटनास्थळी पोहोचत आहेत.