केज तालुक्यातील धनेगाव ( कॅम्प ) येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती पासून ते छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिरे चालू केेले होते.
त्याच अनुषंगाने केज तालुक्यातही आयोजन करण्यात आले. मात्र ब्लड बँकेच्या तारखा शिल्लक नसल्याने हे शिबीर दि.13 जून रोजी घेण्यात आले. शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे व त्यांच्या मित्र परिवाराने केले होते. शिबिरात एकूण 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात केळी व बिस्किटाची सोय कैलास खोडसे यांच्या वतीने तर मास्क वाटप जनविकास सामाजिक संस्थेचे बाबा पोटभरे यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश खोडसे, हरीष जगताप, उत्रेश्वर चेडे, सचिन शिंपले, स्वप्नील अंबुरे, काका गवळी, गोविंद टोणगे, सिद्धेश्वर खोडसे, दत्ता मुजमुले, सुनील वाळके, विश्वजीत खोडसे, किरण खोडसे, अक्षय खोडसे तसेच इतर मित्रपरिवार यांनी प्रयत्न केले.