बीड दि.१४ – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या पंधरा जागा रिक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते तथा महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांना विधान परिषदेवर घेवून बहूजन समाजाला न्याय देण्याची मागणी समता सैनिक करत आहेत.
ऍड. सुभाष राऊत हे ओबीसी बहुजन समाजातील आहेत. मागच्या कित्येक वर्षांपासून त्यांनी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील धरणे आंदोलन, रस्ता रोको, जेल भरो आंदोलन केले आहेत. बीड जिल्ह्यात काढण्यात आलेल्या ओबोसी समाजाचा अभूतपूर्व मोर्चा त्यांच्याच नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे मोठे संघटन करण्यात त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे. त्यांची सामाजिक व राजकीय कामगिरी लक्षात घेऊन |महाविकास आघाडी सरकारने ऍड. सुभाष राऊत यांना न्याय द्यावा अशी मागणी समता सैनिक करत आहेत.