हवामान

विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज……!

10 / 100
मुंबई दि.५ – उन्हाळा सुरु झाला असून उन्हाळ्याची झळही बसू लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानात कमालीची वाढ झाल्याचं दिसत आहे. अशातच पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
                         विकेंडनंतर दोन दिवस कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, आणि जळगाव या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानता बाळगयला सांगितलं आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.                 दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अवकाळी पाऊसाचा सपाटा पहायला मिळत आहे. उन्हाची झळ बसत असतानाही पावसानं हजेरी लावली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close