ब्रेकिंग
35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला…..!

केज दि.८ – तालुक्यातील मांगवडगाव येथे एका ३५ वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून कर्जबाजारी पणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
केज तालुक्यातील मांगवडगाव येथील प्रमोद संदिपान इंगळे वय (३५ वर्षे) या तरुणाने दि. ७ मार्च सोमवार रोजी सायंकाळी ६ वा. च्या दरम्यान गावाच्या पूर्व दिशेला गावा पासून जवळच असलेल्या मारुती साहेबराव गोरे यांच्या शेतातील विहिरीत प्रेत आढळले. युसूफवडगाव पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी विहिरीतील पाणी उपसून मध्य रात्रीच्या सुमारास ८ मार्च मंगळवार रोजी मध्यरात्री १२:३० ते १:०० वा. दरम्यान मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्या नंतर मृतदेह उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलविला आहे.
दरम्यान, सदरील घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली याची माहिती पोलीस घेत असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल. प्रमोद हा विवाहित असून त्याला एक अपत्य आहे. घटनेचा तपास युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे हे करीत आहेत.