क्राइम

कारवाईसाठी गेलेल्या एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकावर हल्ला…..!

10 / 100
गेवराई दि.१७ – खामगाव व सावरगाव येथे गोदावरी नदी पात्रातील अवैद्य वाळू उपशावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लोडरच्या खोऱ्यानी जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला मात्र सुदैवाने ते बचावले.
                 बीड जिल्ह्यात अवैद्य वाळू उपसा करणारे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यांना कुणाचा धाक उरला नाही. दि. १६ मार्च बुधवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार गेवराई तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातील अवैद्य वाळू उपशावर कारवाही करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. या पथकातील पोलीस कर्मचारी बालाजी दराडे, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे व विकास चोपने हे खाजगी वाहनाने केज येथून गेवराईकडे गेले होते. तेथे पोलीस पथक पोहोचतच शहागडकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचे पुर्व बाजु नदी पात्रात जाऊन पोलीस पथकाने रात्री ८:१० वा. छापा मारला. तेथे एक लाल रंगाचे विना नंबरचे ट्रॅक्टर व त्याला वाळू भरण्यासाठी समोर लावलेले खोऱ्याने एलपी ट्रक क्र. (एम एच-२३ / एआर-८८२२) मध्ये वाळु भरत असतांना दिसले त्यावेळी तेथे तीन इसम उभे होते. पोलीस गाडीच्या खाली उतरुन ट्रक व ट्रॅक्टर जवळ जात असताना; ट्रॅक्टरचे लोडरचे बाजुला उभे असलेल्या दोन इसमा पैकी अंगात पांढरे कपडे व दाढी असलेल्या इसमाने त्याचे जवळ उभे असलेल्या काळे कपडयातील इसमांनी ट्रॅक्टर लोडर वरील ड्रायव्हरला मोठयाने अवाज देऊन सांगीतले की, समोरुन येणारे लोकांचे अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मार असे म्हणुन ओरडल्याने ट्रॅक्टर ड्रायव्हरने वाळू भरण्यासाठी असलेले लोडरचे खोरे पोलीसांना जिवे मारण्याचे उद्देशाने बालाजी दराडे व राजू वंजारे यांच्या अंगावर घालुन दोघांना पाडले. त्यावेळी त्यांच्या सोबतचे विकास चोपने, सचिन अहंकारे यांनी त्या दोघांना हाताला धरून बाजुला ओढले. त्यामुळे ते दोघे बचावले. त्या नंतर ट्रॅक्टर लोडर ड्रायव्हरने ट्रॅक्टर लोडर घेवुन नदी पात्राचे बाजुने असेल्या कच्या रस्त्याने काटया कुपाटयाने पळून गेला. तसेच इतर दोन इसम हे नदी पात्राने पळून गेले. त्यावेळी सोबतचे पोलीस यांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते मिळून आले नाहीत.
           दरम्यानघटनास्थळी वाळुने भरलेला ट्रक क्र. (एम एच-२३/ ए आर- ८८२२) हा मिळुन आला. पंचा समक्ष सदर ट्रकचा कलम १०२ सीआरपीसी प्रमाणे सविस्तर जप्ती  पंचनामा करून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीस पथकाने पळून गेलेल्यांची माहिती घेऊन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close