कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने परिस्थिती चिंताजनक होत आहे…..!
मुंबई दि.१७ – गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. आटोक्यात येत असलेली कोरोनाची परिस्थीती पाहता लवकरच कोरोना नष्ट होणार अशी आशा लागून होती. मात्र अशातच पुन्हा एकदा अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.
कोरोनामुळे पुन्हा चिंतेत वाढ झाली आहे. अनेक भागांत कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. कोरोना महासाथीच्या रोगाविषयी WHO नं गंभीर इशारा दिला आहे.काही देशांनी कोरोनाच्या चाचण्या करण्याचं प्रमाण कमी केलं आहे. मात्र, तरीदेखील बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. याचाच अर्थ असा, की आपण आत्ता जे काही बाधितांचे आकडे पाहतोय, ते फक्त हिमनगाचं टोक आहे, असा इशारा WHO नं दिला आहे.
दरम्यान, एकीकडे ओमिक्रॉन आणि बीए.2 मुळे वेगाने प्रसार होत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्याचा देखील परिणाम बाधितांची संख्या वाढण्यात झाला असावा, असं WHO नं म्हटलं आहे.