होळी आणि धुलीवंदनासाठी घातलेले निर्बंध घेतले मागे……!
मुंबई दि.१७ – आज होळीचा सण असून सर्वत्र आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. कोरोनाची परिस्थीती आणि बारावीची परिक्षा लक्षात घेता राज्य सरकारनं होळी आणि धुलीवंदनासाठी नवी नियमावली जाहीर केली होती.
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नव्या नियमावलीमुळे भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळाला. यासोबत नागरिकांची नाराजी पहायला मिळाली. अनेकांना होळीचं सेलिब्रेशन करता येणार नाही याचं दुःख होतं. अशातच नागरिकांची नारजी पाहून ठाकरे सरकानं पुन्हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला पहायला मिळाला. राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारनं नियमावली मागे घेतल्यानं सगळीकडे आनंदीचं वातातवरण दिसत आहे.
दरम्यान, नियमावली मागे घेतली असली तरी सावधगिरी बाळगण्याचं राज्य सरकारनं सांगितली आहे. त्यामुळे काळीजी घेणं गरजेचं आहे.