#Accident

हारून इनामदार यांच्या गाडीला अपघात, बीड येथे उपचार सुरू….…!

14 / 100
केज दि.१९ – शहरातील झुंजार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हारून इनामदार यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांच्यासह चालक जखमी झाला आहे.
              हारून इनामदार हे दि.१९ रोजी केज वरून माजलगाव मार्गे स्कॉर्पिओ गाडीने परभणी ला जात होते. त्यांची गाडी दुपारी ३.३० दरम्यान पाथरी जवळ गेली असता मालवाहू टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक झाली. त्यात स्कॉर्पिओ गाडीचा समोरील भाग व डाव्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे आतमध्ये दबला गेल्याने समोर बसलेल्या हारून इनामदार यांच्या डाव्या हाताला मार लागून हात फ्रॅक्चर झाला आहे.तर चालकही जखमी झाला आहे.सदरील अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती मिळालेली नाही.
              दरम्यान, सदरील अपघात झाल्यानंतर हारून इनामदार यांना बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close