#Social
शिरपुरा येथे शाहिरी पथकाने केली जनजागृती…..!

केज दि.२२ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय,बीड आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, बीड यांच्या वतीने शासकीय योजनेच्या जनजागृतीसाठी लोककला पथकाच्या
माध्यमातून लोकजागर तांबवेश्वर शाहिरी कलापथकाने तालुक्यातील शिरपुरा येथे दि.२१ रोजी जनजागृती केली.
यावेळी गावातील परमेश्वर भानुदास सोनवणे यांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच शाहिरी पथकाचा सत्कार करून आभार व्यक्त केले.