आपला जिल्हा
बीड जिल्ह्यातील दहा फौजदार झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक…..!

बीड दि.22 – राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आज मंगळवारी (दि. २२) राज्यातील ८४६ फौजदारांच्या (पीएसआय) पदोन्नतीची यादी जाहीर केली. या सर्व ८४६ फौजदारांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सध्या कर्तव्यावर असलेल्या दहा जणांचा समावेश असून केज पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दादासाहेब सिद्धे यांनाही बढती मिळाली आहे.
बीड जिल्ह्यात रुजू असलेले दत्तात्रय गंगाधर मंठाळे, ज्ञानदेव प्रल्हाद सानप, सुभाष गोकुळ माने, जयसिंग मदनसिंग परदेशी, गंगाधर शेषेराव दराडे, दादासाहेब विजयकुमार सिद्धे, विठ्ठल त्रिंबक वारे, अर्जुन वामन चौधर, संतोष बाळासाहेब जोंधळे आणि मनोजकुमार श्रीरंग लोंढे या दहा फौजदारांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी बढती मिळाली आहे.