क्राइम

केमिकल पासून दूध निर्मिती करणाऱ्याचा पर्दाफाश……!

6 / 100
बीड दि.२५ – केमिकल पासून दूध बनवून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे.
           सहाय्यक पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत यांना गुप्त बातमिदरा मार्फत बातमी मिळाली की, मौजे नागेश वाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील इसम आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे आपल्या स्वतःच्या फायद्याकरता केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो दूध त्याचे जवळील दुधामध्ये मिक्स करून दूध डेअरीवर विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. अशी माहिती मिळल्यावरून पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार व अन्न भेसळ अधिकारी यांनी सदर ठिकाणी जाऊन 7 वाजता छापा मारला. सदर ठिकाणी वरील इसम हा आपले राहते घरी केमिकल पावडर पासून दूध तयार करत असताना तयार केलेले 160 लिटर दूध व केमिकल पावडर व दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
            दरम्यान, पुढील कारवाई अन्न भेसळ अधिकारी श्री. गायकवाड करत आहेत.तर सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे व अन्न भेसळ अधिकारी श्री.गायकवाड, कांबळे यांनी केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close