केज दि.१६ – तालुक्यातील माळेगाव येथील कोरोना पॉजिटिव्ह आलेल्या महिलेने केजच्या ज्या खाजगी दवाखान्यात भरती होऊन उपचार घेतले होते त्या दवाखान्यातील डॉक्टर सह १० कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले होते ते पूर्ण निगेटीव्ह आल्याने केजकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील माळेगाव येथील एका ६० वर्षीय महिलेची किडनी बदलली होती. दरम्यान औरंगाबाद येथून सदरील महिला माळेगाव येथे आली असता अन्य काही आजाराबाबत केज येथील एका खाजगी दवाखान्यात भरती झाली होती. परंतु आराम न मिळाल्याने त्या महिलेला दि.११ जून रोजी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. दरम्यान त्या ठिकाणी दि.१४ जून रोजी महिलेची कोव्हीड तपासणी केली असता पॉजिटिव्ह आली होती व त्या महिलेचा सोमवारी मृत्यूही झाला. त्यामुळे केज येथील खाजगी दवाखान्यातील डॉक्टरसह १० कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र ते सर्वच्या सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले असून केजकरांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान सदरील महिलेच्या कुटुंबियांचे स्वॅब पाठवण्यात आले असून रिपोर्टची प्रतीक्षा आहे.