क्राइम
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी पोलीसांच्या ताब्यात……!

केज दि.२९ – तालुक्यातील एका गावात शेळ्या सांभाळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याने ती अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच तिला विहिरीत ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातील सहा महिन्या पासून फरार आरोपीला केज पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
केज तालुक्यातील एका गावात शेळ्या सांभाळणाऱ्या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या भावकितील नात्याने चुलत-चुलत भाऊ असलेल्या नराधमाने तीन महिन्या पूर्वी म्हसोबचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारात बळजबरीने बलात्कार केला होता. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती होताच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटना पिडीत अल्पवयीन मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितल्या नंतर त्यांनी केज पोलीस ठाणे गाठून दि. २ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात त्या नराधमाचा विरुद्ध फिर्याद दिली होती. त्या नुसार दि. २ सप्टेंबर रोजी त्याच्या विरुद्ध गु. र. नं. /२०२१ भा. दं. वि. ३७६, ३७६(२) (टी)(एन) ३०७ यासह बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८, १० नुसार बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न करणे व बाल लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान दि. २७ मार्च रोजी या प्रकरणातील आरोपी केज येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, महिला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे, शिवाजी कागदे, वाहन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.