#Accident
शॉर्ट सर्किटमुळे घराला आग…..!

केज दि.१ – तालुक्यातील विडा येथे विजेच्या शॉटसर्किटमुळे घराला आग लागून संसारोपयोगी सामान जाळून खाक झाले आहे.
विडा येथील बुरानोदीन पापामियाँ शेख यांच्या घराला दि.१ एप्रिल रोजी सकाळी 11च्या सुमारास विजेचे शॉटसर्किट होऊन आग लागली असून यात संसार उपयोगी सामानाचे मोठे नुकसान झाले. आग एवढी मोठी होती की यात फ्रीज कॉम्प्रेसर व गॅसकीट चा स्फोट होऊन घरावरील पत्रे जळून पूर्णपणे खाक झाले आहेत. यात एकूण 40000 हजारापेक्षा अधिक नुकसान झाले असून अन्न धान्य, फ्रिज टीव्ही मिक्सर इत्यादी सह मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसून शेजारील लोकांनी वीजपुरवठा खंडित करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
दरम्यान, महसुल विभागा मार्फत तलाठी एल.टी. भोरजे यांनी तर महावितरण मार्फत लखन वरपे यांनी पंचनामा केला आहे तर विडा ग्रामपंचायत मार्फत सरपंच सुरज पटाईत 15000 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत.