क्राइम
मटका अड्ड्यावर धाड, एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त…..!
बीड दि.१ – अवैद्य धंदे बिमोड करण्यासाठी पंकज कुमावत यांच्या पथकाने ३१ मार्च रोजी बीड येथे बालेपीर भागात एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून १ लाख २६ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला.
दि. ३१ मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांना बीड येथील नगर रोड बालेपीर भागातील मुजू कुशन वर्कच्या पाठीमागे पत्र्याची शेडमध्ये सय्यद मुस्तफा सय्यद वाहक हा आपले स्वतःचे फायदा करिता विनापरवाना बेकायदेशीररित्या काही इसमांना एकत्र बसून मिलन नाईट जुगाराचे आकड्यावर लोकांकडून पैसे लावून जुगार खेळ खेळवीत आहे अशी माहिती मिळाली होती. सदर माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी १०.३० वाजता छापा मारून सदर ठिकाणी मिलन नाईट मटका घेणारे खेळणारे एकूण दहा इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्य नगदी व मोबाईल असा एकूण १ लाख २६ हजार ११० रु. मुद्देमाल जप्त करून मटका घेणारे व खेळणारे इसम व मूळ मालक असे एकूण १४ आरोपी पोलीस नाईक राजू वंजारे यांच्या फिर्यादी वरून पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुलकर्णी, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, सचिन अहंकारे, संजय टूले यांनी केली आहे.