जुगार अड्ड्यावर धाड, सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त…..!
पुणे दि.2 – पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सर्व्हंट क्वार्टर्स, कंपाऊंड भिंती लगत बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने काल (दि. १ एप्रिल) छापा कारवाई केली. या कारवाईत १ लाख ४८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शाबीद शेख (वय-४९, रा. नानापेठ), पाहिजे आरोपी आयुब शेख (रा. नानापेठ), राहुल गुप्ता ( वय-२७, रा. विमाननगर), शुभम तळेकर (वय-२६, रा. सोलापूर), सचिन गुरव (वय-४३, रा. अहमदनगर), सिद्धप्पा मुळगुंद (वय-३८, रा. मालधक्का फुटपाथ, पुणे), अजय यल्लमवार (वय-४०, रा. सेव्हन लव्ह्ज चौक, स्वारगेट), अक्षय पाटील (वय-२३, रा. रेल्वे स्टेशन फिरस्ता, मूळ रा. अकोला), किशोर तलवार (वय-४०, रा. बुधवार पेठ), आनंद मराठे (वय-२७, रा. दौंड), राहुल हजारे (वय-४१, रा. भवानी पेठ), राकेश राठोड (वय-२६, रा. क्वीन्स गार्डन आउट हाउस), सलमान शेख (वय-२०, रा. गुरुवार पेठ), अमित पुजारी (वय-३६, रा. ताडीवाला रोड), उमेश सावंत (वय-३०, रा. शिवाजीनगर), रफिक शेख (वय-३६, रा. मंगळवार पेठ), हनुमंत मोरे (वय-२५, रा. दौंड), संतोष चनशेट्टी (वय-४३, रा. हडपसर), जावेद पठाण (वय-५४, रा. गोखलेनगर), पाहिजे आरोपी शाहरुख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला ससून हॉस्पिटलच्या सर्व्हंट क्वार्टर्स, कंपाऊंड भिंतीलगत, आतील बाजूस पत्र्याच्या बंद खोलीत बेकायदेशीर जुगार खेळत व खेळवीत असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता वरील आरोपी पैशांवर अंदर बाहर नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले. त्यातील तीन आरोपी पळून गेले. वरील आरोपींजवळील १ लाख ४८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलमान्वये बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरीक्षक पंढरकर, पोलीस अंमलदार मनीषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, अश्विनी केकाण, संदिप कोळगे, स्नेहा धुरी यांनी केली आहे.