#Accident

पुन्हा ”त्याच” ठिकाणी अपघात…..!

9 / 100
विडा दि.३ – (विनोद ढोबळे) – केज तालुक्यातील विडा येथे जीवघेण्या वळणावर अपघात झाला असून यात पहाडी पारगाव येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
                   बेंगळवाडी येथे घरगुती कार्यक्रम उरकून पहाडी पारगाव ता. धारूर  येथे परतत असताना सदरील ठिकाणी एम.एच.44,.आर 1709 मोटारसायकल चा अपघात झाला. श्रीहरी अंडील (वय 60) आणि विकास कप्पे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.
             दरम्यान, विडा येथील त्या त्रिफळ्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काहींना तर जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे अश्या धोकादायक वळणावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कांहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close