#Accident
केज-कळंब रस्त्यावर तिहेरी अपघात….!
केज दि.४ – ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर एकमेकांना ओव्हरटेक करीत असताना एकाच्या ट्रॉली मधील ऊस दुसऱ्या ट्रॅक्टरच्या हेडवर पडल्याने एक ट्रॅक्टर खड्ड्यात पडले. तर दुसऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मोटार सायकलस्वार धडकला. सुदैवाने अपघातात जीवितहानी मात्र झाली नाही.
दि. ३ एप्रिल रोजी, रात्री ९:३० केज-कळंब रोडने नवनाथ नारायण तांदळे यांचे शेतातून दोन ट्रॅलीमध्ये ऊस भरून केज मार्गे शंभु महादेव कारखान्यावर जात असताना ट्रॅक्टर क्र. (एम एच-४४/एस-८३५३) त्याच्या पाठीमागून आलेले एक ट्रॅक्टर क्र. (एम एच-४४/डी- २०१७) चालक नीतीन रामधन मुंडे याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात हायगईने व निष्काळजीपणे चालवुन त्याची पाठीमागील उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली. त्यातील ऊस नवनाथ तांदळे याच्या ट्रॅक्टरच्या हेडवर पडल्याने ते ट्रॅक्टर बाजुचे खड्यात पडुन नुकसान झाले. तसेच ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पडलेले ट्रॅक्टर क्र. (एम एच-४४/डी- २०१७) हे रोडवर उभे असताना केजच्या दिशेने जाणारा मोटार सायकलस्वार मोटार सायकल क्र. (एम एच-१४/ डी जी-६९४६) हा त्या ट्रॅक्टरला धडकून खाली पडला. या तिहेरी अपघातात मोटार सायकलस्वार किरकोळ जखमी झाला. मात्र या अपघातात जिवीत हानी झाली नाही.