क्राइम
मटका जुगार अडृावर छापा, 76 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल…..!
बीड दि.६ – शहरातील एका लॉज वर मटका घेत असल्याची माहिती मिळल्यावरून पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी छापा मारून मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सम्राट बिअरबारचे वरचे मजल्यावर बंदीस्त रुममध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्य जवळ बाळगून कल्याण मटका व्हॉटस्ऍ़पद्वारे घेत आहेत. त्यावरुन सदर ठिकाणी स्था.गु.शा.चे पथक पाठवून छापा मारला असता त्या ठिकाणी इसम नामे ज्ञानेश्वर आसाराम निंबाळकर, भुषण श्रीपाद दहिवाळ, शरद सुभाष शिंदे, भरत बाबासाहेब जाधव, प्रदीप किशोर वाघमारे, हनुमान मनोहर क्षिरसागर, अशोक रावसाहेब गव्हाणे यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यात (22) मोबाईल, (02) इंटरनेट राऊंडर, (03) कॉम्प्युटर प्रिंटर, CCTV, DVR, LED व इतर मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 2,35,780 /- रु. च्या मुद्येमालासह ताब्यात घेवून सदर बुक्की मालक कोण आहे, याबाबत विचारपूस केली असता त्यांनी विशाल वसंतराव जाधव व उमेश उर्फ विकी शिवशंकर महाजन हे असल्याचे सांगून त्यांनी बीड शहर व जिल्हयातील इतर ठिकाणाहून व्हॉटस्ऍ़पद्वारे वेगवेगळया (67) एजंटकडून कल्याण मटका जुगाराचे आकडे घेत असल्याचे सांगीतले आहे.
त्यावरुन (76) आरोपींविरुध्द पो.स्टे.शिवाजीनगर, बीड गु.र.नं. 128/2022 कलम 120(ब),420,465,467,468,471 भादंविसह कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिवाजीनगर, बीड पोलीस करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.