#Accident
पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले सोयाबीनसह कापूस आणि हरभरा जळून खाक…..!

केज दि.७ – तालुक्यातील पन्हाळवाडी येथे सायंकाळी ५:०० वा. दरम्यान अज्ञात कारणाने आग लागून त्यात रमेश जोगदंड, उमेश जोगदंड आणि दादाराव जोगदंड यांचे पत्र्यांची घरे जळून खाक झाली आहेत
दि ७ एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान उमेश जोगदंड, रमेश जोगदंड आणि दादाराव यांच्या दोन घराचे नुकसान झाले असून दादाराव जोगदंड यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस, सोयाबीन व हरभरा जळून भस्मात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस नाईक उमेश आघाव यांनी ही माहिती आपले वरिष्ठ व तहसीलदार यांना दिली. त्या नंतर तहसीलदार मेंडके यांनी केज नगरपंचायतच्या अग्निशामक विभागाशी संपर्क साधून घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशामक बंब पाठवला. मात्र तो पर्यंत कापूस, हरभरा व सोयाबीन आणि घरातील संसारोपयोगी साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.