क्राइम
अखेर ‘त्या’ कर्मचाऱ्याचा मृत्यू….!

केज दि.11 – मोटार सायकलस्वराचा तिघांनी पाठलाग करून त्याला रस्त्यात अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दि. 9 एप्रिल शनिवार रोजी साने गुरुजी निवासी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहाचे कर्मचारी रमेश एकनाथ नेहरकर (45) रा पिसेगाव ता. केज जि. बीड हे त्यांच्या मोटार सायकल क्र. (एम एच-44 / एफ-4832) कळंब कडून केजकडे येत असताना दुपारी 3:30 वा च्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका डिस्कव्हर मोटार सायकलवरून आलेल्या भागवत चाटे व इतर दोघांनी त्यांचा पाठलाग केला होता. हल्लरखोरांनी रमेश नेहरकर याच्या पाठी मागून चालत्या गाडीवर डोक्यात लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून जखमी केले होते.
दरम्यान, जखमी नेहरकर खाली पडताच हल्लेखोर मोटार सायकली वरून केजच्या दिशेने फरार झाले. डोक्यात रॉड मारल्याने झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यातच त्यांचा लातूर येथे रात्री 12.30 च्या दरम्यान मृत्यू झाला.