#Accident
राजेश चौरे यांचे अपघाती निधन……!
केज दि.१६ – तालुक्यातील जिवाची वाडी येथील रहिवासी राजेश मोकिंदा चौरे (२८) यांचे कर्तव्य बजावत असताना दि.११ रोजी मोटार सायकल अपघातात निधन झाले.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव सज्जाचे तलाठी म्हणून ते कार्यरत होते. मात्र ते वर सज्जावर जात असताना मोटारसायकल चा अपघात झाला. जखमी राजेश चौरे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पीटल मध्ये चार दिवसा पासुन उपचार चालु होते. परंतु अखेर दि.१५ रोजी रात्री ९ वा. त्यांची प्राणजोत मालवली. त्यांचावर जिवाचीवाडी येथील शेतात दि.१६ (शनिवारी) सकाळी १० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आईवडील,बहीनी, भाऊ असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने जिवाचीवाडी गावावर शोकाकूल पसरली आहे.